पीकविमा योजना हा घोटाळाच : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

पीकविम्यात शेतकऱ्यांनी भरलेले पैसे परत का, पीकविमा योजना हा एक घोटाळा आहे. त्याचा फायदा शेतकऱअयांना होत नाही. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना परत मिळालेच पाहिजेत असे म्हणत शिवसेनेचा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. 

मुंबई : पीकविम्यात शेतकऱ्यांनी भरलेले पैसे परत का, पीकविमा योजना हा एक घोटाळा आहे. त्याचा फायदा शेतकऱअयांना होत नाही. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना परत मिळालेच पाहिजेत असे म्हणत शिवसेनेचा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. 

पीकविमा योजना हा एक घोटाळा असून शिवसेनेच्या प्रयत्नांनंतर पीकविम्या कंपन्या ताळावर आल्या असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी मुंबईत सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

शिवसेनेने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी भरपाई मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी तसेच पीकविमा कंपन्यांनी शेतकऱअयांचे घेतलेले पैसे परत करावे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असे आश्वासनही त्यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop insurance is a Fraud says Uddhav Thackeray