सरकारच्या नोटाबंदीमुळे सायबर गुन्ह्यांत वाढ

ऊर्मिला देठे
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

बॅंकांकडे वाढत्या तक्रारी; एटीएम कार्डधारकांची फसवणूक

मुंबई - शहरातील नागरिकांना सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. फोन कॉलवरून होणाऱ्या या ऑनलाइन गुन्ह्यांबद्दलच्या तक्रारींत वाढ झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये 212 आणि नोव्हेंबरमध्ये 264 तक्रारी बॅंकांकडे आल्या आहेत. आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले असले, तरी विशेष बाब म्हणजे यांतील एकाही आरोपीपर्यंत पोचण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

सायबर गुन्हेगार एटीएम कार्डधारकांना लक्ष्य करतात. कार्डधारकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याला फोन करतात. बॅंकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याची थाप मारून एटीएम कार्ड ब्लॉक होणार असल्याचे किंवा ते अपग्रेड करण्यात येणार असल्याचे ग्राहकाला सांगतात. कार्डावरील क्रमांक विचारतात. गोंधळलेले एटीएम कार्डधारक 16 अंकी क्रमांक सांगून मोकळे होतात. कार्डधारकांना विचार करण्याचा वेळ न देता "ओटीपी' विचारण्यात येतो. काही वेळातच ग्राहकाच्या खात्यातून पैसे वळते केले जातात.

बनावट सिमकार्डांचा वापर
ही फसवणूक करणाऱ्यांत परप्रांतीय गुन्हेगार मोठ्या संख्येने असतात. अशा गुन्ह्यांत पोलिसांनी मोबाईल किंवा सिमकार्डच्या आधारावर तपास करण्याचा प्रयत्न केला तर उत्तर भारत किंवा दक्षिणेतील राज्यांतून हे कॉल शोधून काढेपर्यंत आरोपी सिमकार्ड बदलतात. त्यामुळे तपास अधिक अवघड होतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बॅंक अधिकारी कधीही कार्डावरील माहिती किंवा पासवर्ड, एटीएम पिन मागत नाहीत. त्यामुळे अशा फोनकॉलना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोणत्याही अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एटीएमची माहिती विचारणारा कॉल आल्यास माहिती देऊ नये. आपल्या कार्डवरील क्रमांक त्याला सांगू नये. एटीएममधील रक्कम काढताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये.
- सचिन पाटील, पोलिस उपायुक्त, सायबर सेल.

Web Title: Currency ban side effect: Increase in Cyber Crime