आदित्य ठाकरेंचा फोटो वापरुन क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी, आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सअॅपचा वापर करुन पोलीस कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले होते.
आदित्य ठाकरेंचा फोटो वापरुन क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी, आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सअॅपचा वापर करुन पोलीस कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या फोटोचा वापर करत एका क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी कोळीवाड्यातील रहिवासी कुस्तीपटू दिपेश जांभळे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांना 23 ऑगस्ट रोजी एक व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज आला. व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने प्रोफाइल फोटो म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवला होता.

या बनावट युजरने तक्रारदार कुस्तीपटू दिपेश जांभळे यांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. आपल्याला एका मित्राला तातडीने 25 हजार रुपये ट्रान्सफर करायचे असून नेटबँकिंग काम करत नसल्याचे म्हटले. त्यामुळे तातडीने 25 हजार रुपये पाठवण्याची विनंती हॅकर्स आदित्य ठाकरे असल्याचे भासवून केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com