सोशल मीडियावर ‘सायबर’ वॉच! पोलिसांनी शोधल्या तेढ निर्माण करणाऱ्या १४४७२ पोस्ट; ८४७९ पोस्ट डिलीट

साडेतीन वर्षांत राज्यातील सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरील १४ हजार ४७२ पैकी साडेआठ हजार आक्षेपार्ह पोस्ट डिलीट केल्या आहेत. मागील सव्वापाच महिन्यांत सायबर पोलिसांनी ३६८ पोस्ट तत्काळ डिलीट करून तेढ निर्माण होऊ दिलेला नाही.
सायबर पोलिस
सायबर पोलिसsakal

सोलापूर : दोन धर्मात किंवा समाजात, जातीत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडेल अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर सायबर पोलिसांनी वॉच ठेवला आहे. साडेतीन वर्षांत राज्यातील सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरील १४ हजार ४७२ पैकी साडेआठ हजार आक्षेपार्ह पोस्ट डिलीट केल्या आहेत. मागील सव्वापाच महिन्यांत सायबर पोलिसांनी ३६८ पोस्ट तत्काळ डिलीट करून तेढ निर्माण होऊ दिलेला नाही.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. राज्यातील सत्तासंघर्ष अजून संपलेला नाही. अशा परिस्थितीत सामाजिक तेढ निर्माण होऊ लागला आहे. सोशल मिडियातून अनेकजण सक्रियपणे काहीही पोस्ट व्हायरल करण्यात आघाडीवर आहेत. अशा समाजकंटकांवर सायबर पोलिसांकडून वॉच ठेवला जात आहे.

जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता राज्यातील स्थानिक पोलिस घेत आहेत. दुसरीकडे राज्यभरातील ५२ सायबर पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. कोल्हापुरातील घटनेनंतर पोलिस जास्त सक्रिय झाले आहेत. ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली सामाजिक वातावरण दूषित होणार नाही, यादृष्टीने पोलिसांकडून सोशल मीडियावरील तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट तात्काळ डिलीट केल्या जात आहेत.

साडेतीन वर्षातील आक्षेपार्ह पोस्ट

  • सोशल मिडिया आक्षेपार्ह पोस्ट डिलीट पोस्ट

  • ट्विटर १०,२०९ ५,९५४

  • फेसबूक २,०४९ १,०२०

  • इन्स्टाग्राम १,९१० १,३५०

  • युट्यूब २८३ १४२

  • इतर २१ १३

  • एकूण १४,४७२ ८,४७९

व्हॉट्‌सॲप ग्रूप ॲडमिन होईल साक्षीदार

व्हॉट्‌सॲपवर ग्रूप तयार केल्यानंतर काहीजण कोणतीही शहानिशा न करता आलेली पोस्ट आहे तशीच व्हायरल करतात. त्यातून जातीय-धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीविरूद्ध कलम १५३ अ, २९५ अ, ५०५ व ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. त्यावेळी व्हॉट्‌सॲपचा ग्रूप ॲडमिन साक्षीदार म्हणून बोलावला जातो.

घनसोलीत लवकरच सायबर सेक्युरिटी केंद्र

सध्या राज्याच्या सायबर कार्यालयात केवळ १२ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील ५२ सायबर पोलिस ठाण्यांवर वॉच ठेवण्यासाठी अद्याप मनुष्यबळ अपुरेच आहे. पण, सोशल मीडियाचा अतिवापर व आक्षेपार्ह पोस्टमधून सामाजिक तेढ निर्माण होण्याचे वाढलेले प्रकार, सायबर गुन्हेगारांकडून होणारी ऑनलाईन फसवणूक थांबविण्याच्या अनुषंगाने मुंबईतील घनसोली रेल्वे स्थानकाजवळ राज्याचे सायबर सेक्युरिटी केंद्र उभारले जात आहे. त्याद्वारे अशा प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास सायबर पोलिस अधीक्षक संजय शिंर्थे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com