रत्नागिरीत रोखली दादर पॅसेंजर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

रत्नागिरी : जागा न मिळाल्याने संतापलेल्या चाकरमान्यांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजर साडेचार तास रोखून धरली. मडगावमधून आलेल्या प्रवाशांनी गाडीतच तळ ठोकल्याने हा गोंधळ झाला. पोलिसांच्या इशाऱ्यानंतर आरक्षित डब्यातील प्रवाशांना केरळ संपर्क क्रांती एक्‍स्प्रेसमधून रवाना करण्यात आले. त्यामुळे पॅसेंजर गाडी साडेचार तास रखडली. 

मडगाव-रत्नागिरी गाडीसाठी प्रवासी मध्यरात्रीपासून ठाण मांडून होते; मडगाववहून आलेल्या गाडीत मुंबईला जाणारे प्रवासी आधीच होते. रत्नागिरीकरांसाठीच्या डब्यात गर्दी पाहून प्रवाशांनी खेड, संगमेश्वर, चिपळूणसाठी आरक्षित डब्यात प्रवेश केला. अधिकारी आणि रेल्वे पोलिसांनी त्यांना हटकले. प्रवाशांनीही गोंधळ करत "आम्ही खाली उतरणार नाही', असा पवित्रा घेतला. गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेण्यासाठी रेल्वे पोलिस डब्यात घुसल्यानंतर आरपीएफ जवान आणि प्रवाशांत जुंपली. आरक्षित डबे रिकामे केल्याशिवाय गाडी सोडणे शक्‍य नव्हते. रेल्वे पोलिसांसह, अधिकारी प्रवाशांपुढे हतबल झाले. तिन्ही आरक्षित डब्यात चारशे ते पाचशे प्रवासी होते. शेवटी सुरक्षा बलाच्या पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्याला घाबरून प्रवाशांनी कुटुंबीयांना घेऊन बाहेरचा रस्ता धरला. रेल्वे पोलिसांनी काहींना केरळ संपर्क क्रांतीमध्ये बसवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पावणेनऊ वाजता पॅसेंजर गाडी रवाना झाली. 

Web Title: Dadar Passenger stop in ratnagiri