Vidhan Parishad Election : नाशिकमध्ये दराडे विजयी

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत तब्बल २६ तास मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी बाजी मारली. विजयी होण्यासाठी आवश्‍यक ३१,५७६ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी १९ व्या फेरीपर्यंत मतमोजणी झाली.
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Electionsakal
Updated on

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत तब्बल २६ तास मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी बाजी मारली. विजयी होण्यासाठी आवश्‍यक ३१,५७६ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी १९ व्या फेरीपर्यंत मतमोजणी झाली. सोमवारी (ता.१) सकाळी ८ वाजता सुरु झालेली मतमोजणी २६ तासांनंतर आज सकाळी १० वाजता पूर्ण झाली. विधान परिषदेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवत किशोर दराडे यांनी शिक्षक मतदारसंघात सलग दोन वेळा विजयी होण्याचा इतिहास रचला आहे.

नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी नाशिकमध्ये पार पडली. एकूण एक हजार ७०२ मते अवैध ठरल्यामुळे ६३,१५१ वैध मतांच्या आधारे कोटा निश्‍चित करण्यात आला. उमेदवाराला विजयी होण्यासाठी ३१,५७६ इतका मतांचा कोटा निश्‍चित करून देण्यात आला. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेतली. पहिल्या ३० हजार मतांमध्ये त्यांना १७७५ मतांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या फेरीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार विवेक कोल्हे व दराडे यांच्यातील अंतर नऊ हजारांवर राहिले आणि दराडे हे विजयाच्या कोट्यापासून अवघे पाच हजार मतांनी दूर राहिले. पहिल्या पसंतीची सर्व मते मोजल्यानंतर रात्री एक वाजेपासून दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यास सुरुवात झाली. सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारापासून ही मतमोजणी सुरु झाली. क्रमाक्रमाने एक-एक उमेदवार बाद करून त्यांना मिळालेल्या मतांमध्ये दुसऱ्या पसंतीची मते किशोर दराडे व विवेक कोल्हे यांना देण्यात आली.

१९ व्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना बाद ठरवून त्यांना मिळालेल्या मतांची मोजणी करण्यात आली. अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारामध्ये झाली. यामध्ये जिंकून येण्यासाठी ३१,५७६ मतांचा कोटा १९ व्या फेरीत किशोर दराडे यांनी पूर्ण केला. त्यांना ५,०६० मते मिळाली आणि विजयाचा गुलाल त्यांनी उधळला. पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मिळून दराडेंना एकूण ३२ हजार ३०९ मते मिळाली.

किशोर दराडे यांनी सहा वर्षांत शिक्षकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी केलेल्या कामाची ही पावती आहे. शिक्षक हे विकासाचे व्हिजन ठेवून मतदान करतात. विकासाचे कार्य कोण करू शकते याचा शिक्षकांना विश्वास असल्याने आमचे उमेदवार पुन्हा विजयी झाले.

- दादा भुसे, पालकमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.