Dasara Melava 2022 : शिवाजी पार्क कोणालाच नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava 2022 Shivaji Park shiv sena thackeray shinde politics mumbai

Dasara Melava 2022 : शिवाजी पार्क कोणालाच नाही?

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटानेही दावा केला असला तरी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव आणि न्यायालयानेही शिवसेना कोणाची यावर अद्याप निर्णय दिला नसल्याने हे मैदान कोणालाच दिले जावू नये, असा सूर विधी विभागाने लावल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील एमएमआरडीए मैदानाची चाचपणी देखील सुरू केली आहे.

१९६६ पासून शिवसेना शिवाजी पार्कवरच्या मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करते. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणत्या गटाला परवानगी द्यायची याबाबत मुंबई महापालिकेने नगरविकास विभागाकडे विचारणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच नगरविकास विभाग असल्याने त्यांनाच हे मैदान हवे आहे. त्यासाठी त्यांच्या गटाने अर्जही केला आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने विधी विभागाचे मतही घेतले जात आहे. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने दोन्ही गटांना मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Dasara Melava 2022 Shivaji Park Shiv Sena Thackeray Shinde Politics Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..