Uddhav Thackeray Dasara Melava : फडणवीसांनी माणसं संपवली, आता चंद्रकांत पाटलांच्या मागे लागले; सुषमा अंधारेंचा घणाघात

शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना अंधारेंनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे.
Dasara Melava 2023 sushma andhare Slam Devendra Fadnavis Shivaji Park speech marathi news
Dasara Melava 2023 sushma andhare Slam Devendra Fadnavis Shivaji Park speech marathi news

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे होत आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना त्या भाषणापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Uddhav Thackeray Dasara Melava 2023)

देवेंद्र फडणवीसांना लोक चाणक्य म्हणतात. पण मला काही ते चाणक्य वाटत नाहीत. चाणक्य माणसं घडवणारा असतो. उदाहरणार्थ पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, खुद्द अजितदादांना घडवलं. बाळासाहेबांनी अढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, भास्कर जाधव, संजय राऊत, अरविंद सावंत आणि उध्दव ठाकरे यांना घडवलं. देवेंद्रजींनी कोणाला घडवलं? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला..

Dasara Melava 2023 sushma andhare Slam Devendra Fadnavis Shivaji Park speech marathi news
Dasara Melava 2023 : एकीकडे अडीच लाख वडापाव तर दुसरीकडे घरची भाकर; कथा दोन्ही दसरा मेळाव्याची

देवेंद्रजींनी कुणालाच घडवलं नाही, त्यांनी फक्त जमवलं. देवेंद्रजी तुम्ही एका महाशक्तीचे महा नेते आहात तुम्ही, पण तुम्ही माणसं संपवलीत. तुमच्याकडे बोलायला नेते नाहीत, कराण विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे असे अनेक नेते तुम्ही संपवले, आता तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागला आहात असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, मला फडणवीसांना विचारायचं आहे की, तुमच्याकडे इतकं मोठं संघटन आहे, दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमचीच सत्ता आहे तरी पण शिवसेनेतून राष्ट्रवादीतून उचलेगीरी का करत आहेत. तुम्ही कसले चाणक्य? असा सवाल केला.

Dasara Melava 2023 sushma andhare Slam Devendra Fadnavis Shivaji Park speech marathi news
Uddhav Thackeray Dasara Melava: "गद्दारांनी दिल्लीची चाकरी करावी, निवडणुकीची गरज भासणार नाही"; दानवेंची शिंदे गटावर टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com