Dasara Melava : जनतेने दसरा मेळाव्याला जाऊच नये; बिग बॉस फेम अभिनेत्याची वादात उडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dasara Melava : जनतेने दसरा मेळाव्याला जाऊच नये; बिग बॉस फेम अभिनेत्याची वादात उडी

Dasara Melava : जनतेने दसरा मेळाव्याला जाऊच नये; बिग बॉस फेम अभिनेत्याची वादात उडी

Abhijeet Bichukale On Dasara Melava Row : येत्या काळात मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, हा दसरा मेळावा नेमका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होणार की उद्धव ठाकरे यांचा याबाबत अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावरील पेच कायम आहे. या सर्व वादात आता बिग बॉस फेस अभिजित बिचुकले यांनीदेखील उडी घेत शिवसेना आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तसेच जनतेने दसरा मेळाव्याच्या सभेला जाऊच नये, असा सल्लाही दिला आहे.

हेही वाचा: Kruna Munde : दसरा मेळाव्याच्या वादात आता करूणा मुंडेंची उडी; म्हणाल्या, 'संघर्ष...'

सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण हे जनतेच्या हिताचे नाही तर कोण मोठा यावरुनच सुरू आहे, त्यामुळे जनतेचे दसरा मेळाव्याच्या सभेला जाऊच नये, असे मत अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केले आहे. दसऱ्याचे कुणाला काही देणे-घेणे नसून, शिवसेना आणि शिंदे गटाला राजकीय स्वार्थ साधायचा असल्याचेही बिचुकलेंनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ नये यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा असून, दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीति आखल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा: Cm शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देणार; दसरा मेळावा ठरणार खास

अभिजित बिचुकले यांनी यापूर्वीदेखील राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत असतात. त्याशिवाय त्यांच्या वेगळ्या वक्तव्यांमुळेदेखील ते नेहमी चर्चेत असतात. त्यात आता सध्या सुरू असलेल्या दसरा मेळाव्यावरील वादातही बिचुकले यांनी त्यांचे स्वतःचे रोखठोक मत व्यक्त केले असून, सध्या राज्यात कोण मोठा यावरून राजकारण सुरू आहे. हे राजकारण जनतेच्या हिताचे नाहीये. त्यामुळे नागरिकांनी येत्या काळात होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याकडे पाठ फिरवावी असा सल्ला बिचुकले यांनी नागरिकांना दिला आहे.

Web Title: Dasara Melava Row Abhijeet Bichukale Eknath Shinde Uddhav Thackeray Big Boos

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..