Dasara Melava: उद्धव नव्हे शिंदेंचा आवाज चढला! गाठली ८९.६ डेसिबलची पातळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dasara melava uddhav thackeray cm eknath shinde Noise levels at dasara melava mumbai

Dasara Melava: उद्धव नव्हे शिंदेंचा आवाज चढला! गाठली ८९.६ डेसिबलची पातळी

मुंबई: दसऱ्याच्या निमीत्ताने मुंबईत काल शिवसेनेचा शिवतीर्थावर तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी करण्यात आलेल्या भाषणादरम्यान शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. यादरम्यान दसरा मेळाव्यात आवाज कोणाचा? याबद्दल आवाज फाउंडेशन तर्फे अहवाल जारी करत माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला आवाज सर्वाधिक होता, अशी माहिती देण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवतीर्थावरील सभेत आवाजाची पातळी जास्त होती असा निष्कर्ष आवाज फाऊंडेशनने काढला असून त्याबाबत त्यांनी अहवाल जारी केला आहे.

आवाज फाऊंडेशनच्या मोजणीत शिवाजी पार्कच्या मेळाव्यात १०१.६ डेसिबल इतका आवाज होता. तर, वांद्र्यातील बीकेसीत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ८८ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेनंतर श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र; म्हणाले, एका दीड वर्षाच्या...

तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात किशोरी पेडणेकर यांचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला. त्यांच्या भाषणावेळी ९७ डेसिबलपर्यंत आवाज गेला होता. तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात सर्वाधिक आवाज खासदार धैर्यशील माने ८८.५ डेसिबल नोंदवला गेला. अशी माहिती आवाज फाउंडेशनच्या मोजणीत समोर आली आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्या आवाजाची पातळी ही ८८.४ डेसिबल होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची पातळी ८९.६ डेसिबल नोंदवण्यात आली.

हेही वाचा: Video: मुख्यमंत्र्यांचं भाषण लांबलं अन् लोकांनी सोडलं सभास्थळ; वाचा प्रतिक्रिया

मेळाव्याला गर्दी किती?

दोन्ही गटांनी आपापल्या मेळाव्यांना किती गर्दी झाली याचे दावे केले आहेत. त्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला अडीच लाख लोकांनी उपस्थिती लावल्याचं सांगितलं जात आहे. तर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ३ लाख लोक उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण मुंबई पोलिसांनी हा दावा खोडून काढला आहे. कारण शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ८० हजार तर बीकेसीची क्षमता १ लाखांची आहे. त्यामुळं कालच्या मेळाव्यांच्या गर्दीचा विचार केल्यास ठाकरेंच्या सभेला सुमारे १ लाख तर एकानाथ शिंदेंच्या सभेला दोन लाख लोक उपस्थित असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.