कोल्हापूर/सोलापूर/नगर - राज्यभरात ‘दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ च्या अखंड जयघोषात व भाविकांच्या उत्साहात आज दत्तजयंती साजरी करण्यात आली. नृसिंहवाडीसह अक्कलकोट, शिर्डी आदी तीर्थक्षेत्री लाखो भाविकांनी गर्दी केली होती. अबीर-गुलाल व फुलांची उधळण करीत दत्त जन्मकाळ सोहळा झाला.