...अन् दाऊद इब्राहिमला मारण्याची योजना फसली

पीटीआय
Tuesday, 25 February 2020

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला १९९८ मध्येच मारण्याची योजना छोटा राजनने बनवली होती. मात्र, दाऊदचा जुना सहकारी मिर्झा दिलशाद बेग याने दाऊदला आमची योजना सांगितली अन् आमची दाऊदला मारण्याची योजना फसली, असा खुलासा कुख्यात गुंड एजाज लकडावाला याने पोलिस चौकशीदरम्यान केला आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला १९९८ मध्येच मारण्याची योजना छोटा राजनने बनवली होती. मात्र, दाऊदचा जुना सहकारी मिर्झा दिलशाद बेग याने दाऊदला आमची योजना सांगितली अन् आमची दाऊदला मारण्याची योजना फसली, असा खुलासा कुख्यात गुंड एजाज लकडावाला याने पोलिस चौकशीदरम्यान केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाटणा येथील विमानतळावरून लकडावालाला ताब्यात घेतले होते. सध्या त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. याचौकशी दरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली. या वेळी तो म्हणाला, की भारतीय गुप्तचर संस्थेच्या साथीने १९९८ मध्ये दाऊद इब्राहिमला मारण्याची योजना बनवली होती. यासाठी विकी मल्होत्राने एक टीम तयार केली होती. त्या टीममध्ये मी देखील होतो. माझ्या व्यतिरिक्त यामध्ये फरीद तानाशा, बाळू डोकरे, विनोद मतकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचाही समावेश होता.

‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ कोण ठरणार; आज होणार फैसला

दाऊदची मुलगी मारिया हिच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीसाठी दाऊद कराचीतील एका दर्ग्यात येणार होता. त्या वेळी त्याला ठार करण्यासाठी आम्ही तयार होतो, असे लकडावालाने पोलिसांना सांगितले. मात्र, आम्ही त्या दर्ग्याजवळ जाणार तेवढ्यात छोटा राजनने आम्हाला फोन करून आपली योजना दाऊदला समजली असल्याचे सांगत ती जागा सोडून जाण्यास सांगितले. यानंतर पाकिस्तान पोलिसांनी आम्ही ज्या फ्लॅटवर राहणार होतो तिथे छापा टाकला, असे लकडावालाने पोलिसांना सांगितले.

मुंबई विमानतळावर आलेल्या ५० हजार प्रवाशांची तपासणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dawood ibrahim murder plan fail