‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ कोण ठरणार; आज होणार फैसला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

पुणे - राज्यातील तरुणींच्या कलागुणांना संधी देण्यासाठी; तसेच सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी (ता. २५) पुण्यात होणार आहे. यामधून सौंदर्यवतीची निवड केली जाणार असून, त्याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

पुणे - राज्यातील तरुणींच्या कलागुणांना संधी देण्यासाठी; तसेच सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी (ता. २५) पुण्यात होणार आहे. यामधून सौंदर्यवतीची निवड केली जाणार असून, त्याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

‘सकाळ’ने सलग तिसऱ्या वर्षी ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यासाठी नागपूर, नाशिक, जळगाव, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर व औरंगाबाद येथे या स्पर्धेच्या ऑडिशन झाल्या. पुणे येथे ऑडिशनची अंतिम फेरी पार पडली. यामधून २१ तरुणींची निवड करण्यात आली. कोरिओग्राफर व या स्पर्धेचे दिग्दर्शक लोवेल प्रभू यांनी या तरुणींचे ग्रुमिंग करून त्यांना स्पर्धेविषयी टिप्स दिल्या.

'भाजप नेत्यांना पायऱ्यांवर पाहून आमचे दिवस आठवले, ओरडून घसा कोरडा व्हायचा'

त्याचप्रमाणे स्पर्धेच्या प्रायोजकांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, २१ तरुणींच्या उपस्थितीत क्राऊनचा अनावरण सोहळाही पार पडला. त्याचप्रमाणे ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’च्या सातारा रस्ता, कोथरूडमधील हॅप्पी कॉलनी, चिंचवड व औंधमधील दालनाला सौंदर्यवतींनी भेट देऊन तेथे विविध उपक्रमही राबविले. 

विरोधकांचा एकोप्याने सामना करा - महाविकास आघाडी

दरम्यान, मंगळवारी या स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. त्यामुळे निकालाच्या पूर्वसंध्येला  अंतिम फेरीत पोचलेल्या २१ तरुणींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकत होते. तसेच, आपणच या स्पर्धेची विजेती होणार, असे प्रत्येकीला वाटत आहे. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनतही घेतली आहे. या स्पर्धेची अन महाराष्ट्राची सौंदर्यवती कोण होणार?, याबाबत राज्यातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोरेगाव भीमाप्रकरणी कोणाची साक्ष नोंदविणार? वाचा

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ आहेत. सहप्रायोजक रावेतकर ग्रुप व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आहेत; तसेच हेअर अँड मेकअप पार्टनर लीझ ब्यूटी सेंटर अँड स्पा, फॅशन पार्टनर आयएनआयएफडी पिंपरी-चिंचवड, इथेनिकवेअर पार्टनर हस्तकला सारीज, वेलनेस पार्टनर डॉ. बनसोडेज आयुर्वेद पंचकर्म रिसर्च सेंटर, बिस्पोक काऊचर पार्टनर फ्रेंच नॉट, अस्थेटिक पार्टनर स्किनटिलेटिंग, ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज, कोरिओग्राफर अँड टॅलेंट ग्रुमर लोवेल प्रभू, फॅशन फोटोग्राफर जितेश पाटील आणि व्हेनू पार्टनर अमनोरा द फर्न हॉटेल अँड क्‍लब हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who is sakal beauty of maharashtra 2020