'चंद्रकांत पाटलांना काही कामं नाहीत, म्हणून भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय' I Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 दिवसांत आघाडी सरकार पडणार, असं म्हंटलं होतं.

'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

महाबळेश्वर (सातारा) : राज्यातील आघाडी सरकार हे उत्तम काम करीत आहे. कोणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र निवडणुका (Election) लढण्याचा निर्णय घेतला, तर पुढील पाच वर्षेही राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

माजी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे १५ दिवसांत आघाडी सरकार पडणार, असे म्हटल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, ‘‘पाटील यांना आता काही काम उरले नाही. त्यामुळे त्यांनी आता नवीन भाकीत व्यक्त करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा.’’ सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे पराभूत झाले. पुढील काळात ते स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहेत. या प्रश्नावर श्री. पवार म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेची निवडणूक ही आघाडी करून लढविली नाही. सर्व उमेदवार हे स्वतंत्र उभे राहिले होते. काही उमेदवार हे सहकार पॅनेलच्या वतीने निवडणूक लढवीत होते. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला स्वायत्तता आहे. त्यामुळे आलेला निकालही त्यांनी स्वीकारला पाहिजे.’’

हेही वाचा: रांजणेंचा 'विजय' दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय आहे : शिवेंद्रराजे

आमदार शशिकांत शिंदे यांच्याबाबत ते म्हणाले, ‘‘शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती. नवनिर्वाचित बॅंकेतील संचालकांनी आता भविष्यात राजकारणाचे जोडे बाहेर काढून बॅंकेचा कारभार राजकारणविरहित केला पाहिजे.’’ राज्य परिवहन मंडळाची आर्थिक स्थिती बिकट आहे. १९४८ मध्ये राज्यातील पहिली एसटी रस्त्यावर धावली. तेव्हापासून कर्मचारी यांचे पगार देण्यासाठी कधी ॲडव्हान्स घेण्याची वेळ महामंडळावर आली नाही. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे कर्मचारी यांचे पगारासाठी पाचशे कोटी रुपयांचा राज्य सरकारकडून ॲडव्हान्स घेण्याची वेळ या महामंडळावर आली.

हेही वाचा: 'शशिकांत शिंदे काय आहे, हे दाखवून देण्याची वेळ आता आलीय'

एसटी हे सर्वसामान्यांना दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी जर मान्य केली, तर राज्य शासनावर मोठा आर्थिक भार पडणार आहे. याचा विचार राज्य शासनाने केला पाहिजे. परिवहन महामंडळाप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांनीही मागणी केली आहे. अशा राज्यात १५ संस्था आहेत. त्या संस्थाही अशीच मागणी करतील. याबाबतही विचार झाला पाहिजे. एसटीमध्ये आता कोणती संघटना अधिकृत आहे, याचा निर्णय झाला पाहिजे. त्यामुळे विलीनीकरणाचा करार कोणाबरोबर करायचा हेही अद्याप स्पष्ट झाले नाही. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विरोधकांनाही हे प्रकरण पेटविण्याची आयती संधी मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: DCC Bank Election : साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?

राज्यात आघाडी सरकार आहे. भविष्यातील निवडणुका या एकत्र लढायच्या, की स्वबळावर याबाबतही पक्षाचे धोरण लवकरच निश्चित केले जाईल.

-शरद पवार, ज्येष्ठ नेते

हेही वाचा: NCP कार्यालयावर दगडफेक दुर्दैवी : शरद पवार

loading image
go to top