रांजणेंचा 'विजय' दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय आहे; शिवेंद्रराजेंची आमदार शिंदेंवर सडकून टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendrasinharaje Bhosale

'कुणीही अंगावर आले, तरी शिंगावर घेण्याची माझी तयारी आहे.'

रांजणेंचा 'विजय' दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय आहे : शिवेंद्रराजे

केळघर (सातारा) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज सर्वसामान्य कुटुंबातील ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी विजय मिळवून इतिहास निर्माण केला आहे. रांजणे यांचा हा विजय जावळी तालुक्यातील दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय असून रांजणे हे संचालक झाल्याने जावळी तालुक्याला हक्काचा संचालक जिल्हा बँकेत मिळाला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जावळी तालुक्यात विजय मिळवून दादागिरीचं राजकारण हद्दपार करू, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांनी व्यक्त केला.

मेढा येथे मानकुमरे पॉईंटवर जिल्हा बँकेवर निवडून आल्याबद्दल रांजणे यांचा सत्कार आमदार भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना रांजणे, माजी सभापती अरुणा शिर्के, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, मालोजीराव शिंदे, अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, रवींद्र परामने, तुकाराम धनावडे, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, कांतिभाई देशमुख, जयश्री मानकुमरे, जयदीप शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.

हेही वाचा: आमदार शिंदेंचा 'करेक्ट' कार्यक्रम करून शिवेंद्रराजेंनी धरला गाण्यावर ठेका

Shivendrasinharaje Bhosale

Shivendrasinharaje Bhosale

आमदार भोसले म्हणाले, या निवडणुकीत वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आज रांजणे यांचा विजय झाल्याने, ते जो जिता वही सिकंदर ठरले आहेत. जावळी तालुक्यात कुणीही कितीही लक्ष घालू द्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही तुमचे आव्हान परतवून लावू. आमदार शिंदे यांनी आपल्या पराभवाची करणे शोधावीत. आपल्या चुका शोधाव्यात. पराभवाचं खापर फोडण्याऐवजी आत्मतपरिक्षण करावं. तालुक्याचा विकास व्हावा, अशीच माझी भूमिका असून कुणीही अंगावर आले तरी शिंगावर घेण्याची माझी तयारी आहे.

हेही वाचा: 'शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला; पण..'

रांजणे यांना निवडून देणारे सर्व मतदार त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले आणि धमक्या, दादागिरी या सगळ्या गोष्टींना पुरून त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना ताकद दिली आणि या सर्वांचं मार्गदर्शक किंवा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं आणि शेवटपर्यंत पण एकत्र राहण्याची भूमिका बजावण्याचे काम मानकुमरे यांनी केले. वसंतराव मानकुमरे काय म्हणतात, सगळ्यांना एक ताकद देण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही सगळे जण मिळून जिल्हा बँकेत चांगले काम करू. यावेळी वसंतराव मानकुमरे यांचेही भाषण झाले. रांजणे म्हणाले, हा विजय तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय असून यापुढे ही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: 'आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं दु:ख; राजकीय समिकरणं बदलणार'

loading image
go to top