Maharashtra Monsoon Session : "कलाम मुस्लिमांचे हिरो असू शकतात, औरंगजेब नाही"; राज्यातील दंगलींवर फडणवीसांनी सभागृहात दिली माहिती

DCM Devendra Fadanvis | महिला आणि बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Esakal

DCM Devendra Fadanvis : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांसंबंधीची माहिती सभागृहात दिली.

यावेळी ते म्हणाले कि, गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमाक देशात तिसरा नाही तर तो १०वा आहे.  महिला आणि बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. असाम, दिल्ली, ओडिसा, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान, अंदमान निकोबार, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. 

Devendra Fadanvis
Pune City Crime : सुसगाव वस्तीवर मध्यरात्री चोरी, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद

यावेळी ते म्हणाले कि , गेल्या काही दिवसात राज्यात मुद्दाम औरंगजेबाच्या मिरवणुकी निघाल्या. मुद्दाम काही लोक त्याचे स्टेटस ठेवत आहेत. औरंगजेब हा परकीय आहे. भारतीय मुसलमानांचा तो हिरो होऊ शकत नाही.

Devendra Fadanvis
Kedarnath Landslide : केदारनाथ यात्रा मार्गावर झाले भूस्खलन, अनेक जण आडकल्याची भीती

भारतीय मुसलमानांचे हिरो हे ए.पी.जे अब्दुल कलाम आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. जो कोणी राज्यात औरंगजेबाचा पुरस्कार करेल त्याला आम्ही सोडणार नाही असेही फडणवीस म्हणले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com