मृत पित्याला पाणी पाजण्यापासून रोखले

तानाजी टकले
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

आष्टा - सरणावरील बापाला पाणी पाजण्याचा अन्‌ त्याच्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार मुलाला असतो. पण इथं पोराचं लगीन झालं नाही म्हणून त्याला बापाला पाणी पाजण्यापासून रोखलं. समाजानं पुजाऱ्याला फटकारलं, पण पुजाऱ्याचा अट्टहास आडवा आला. पुजाऱ्याच्या या कृत्यामुळे मुलाला बापाला पाणी पाजता  आलंच नाहीच. 

इस्लामपूर येथे घडलेल्या या प्रकाराची माहिती समाज संघटनेचे नेते प्रकाश मोरे यांनी ‘सकाळ’ला दिली. त्यांनी या प्रकाराविरोधात उद्या (ता. ४) होणाऱ्या बैठकीत विरोध करून अशा प्रकारांना कायमचा पायबंद घातला जाईल  असे सांगितले.

ही घटना आठवडाभरापूवी घडली. निधन झालेल्या बापाला पाणी पाजण्यावेळी पुजाऱ्याने हस्तक्षेप केला. मुलाऐवजी पुतण्याकरवी विधी उरकला. उपस्थितांनी याबाबत नाराजी व्यक्त केली, तरी त्याकडे दुर्लक्ष करीत ‘मी करीन तो कायदा’ अशा आविर्भावात पुजाऱ्याने उपस्थितांना फटकारले. त्याच्या या कृत्यामुळे मुलाला जन्मदात्याच्या धार्मिक विधींपासून दूर राहावे लागले. याबाबत समाजातील तरुणांनी संताप व्यक्त केला. संघटनेकडे धाव घेतली. त्यामुळे उद्या (ता. ४) उत्तरकार्य विधीसाठी इस्लामपुरात पुजाऱ्याच्या या कृत्याविरोधात फैसला  होणार आहे.

जात पंचायत, पाटीलकीविरोधात आम्ही आंदोलन केले ते रद्द झाले. समाजात प्रबोधन होत असताना आता पुजाऱ्यांनी चुकीच्या प्रथांद्वारे प्रबोधनाच्या चळवळीला खीळ घालू नये. आम्ही असे प्रकार मोडून काढू.
- प्रकाश मोरे, रमेश मोरे, अध्यक्ष व पदाधिकारी, पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना

Web Title: Dead father stop from drinking water