बारावी परीक्षेसाठी अर्जांची 21 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत

बारावी परीक्षेसाठी अर्जांची 21 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत

पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजना आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 1 ते 21 ऑक्‍टोबरदरम्यान अर्ज करता येईल. 
बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 31 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सरकारच्या आदेशानुसार उच्च माध्यमिक शाळांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी नियमित विद्यार्थ्यांची शास्त्र, कला आणि वाणिज्य शाखांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्‍यक आहे.

सरल डेटावरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांचे, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सरल डेटामध्ये नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाइनच भरायचे आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com