esakal | Maharashtra : म्युकरमायकोसिसच्या 13 टक्के रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

म्युकरमायकोसिस

Maharashtra : म्युकरमायकोसिसच्या 13 टक्के रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : म्युकरमायकोसिसमुळे राज्यात एक हजार 376 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 10 हजार 266 रुग्णांना म्युकरमायकोसिसचे निदान झाले असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

हेही वाचा: देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू; नवी नियमावली जाहीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काळी बुरशी म्हणजे म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून आले. राज्यात सोमवारपर्यंत (ता. 10) या आजाराने निदान झालेल्या रुग्णांपैकी सात हजार 890 रुग्ण बरे झाले. मात्र, हा आजार असलेल्या 13 टक्के (1 हजार 376) रुग्णांचा मृत्यू झाला, अशी आकडेवारी आरोग्य खात्याने दिली.

म्युकमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी वेगवेगळ्या विशेषज्ञ डॉक्टरांची गरज असते. त्यात काना, नाका आणि घसा तज्ज्ञांसह, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, मेंदू शल्यचिकित्सक अशा अनुभवी डॉक्टरांचा संघ त्यासाठी आवश्यक असतो. असे तज्ज्ञ डॉक्टर असलेले राज्यातील 592 रुग्णालयांमधून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी 97 सरकारी रुग्णालये होती. तर, 495 खासगी रुग्णालयांचा त्यात समावेश होता. या आजारासाठी ‘अँफोटेरेसिन-बी लायफोसोमल’ हे अत्यंत महागडे औषध आहे. त्यामुळे या उपचारांचा खर्च बहुतांश रुग्णांमध्ये 20 ते 30 लाखांहून अधिक झाला. हा आजार झालेल्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्णांसाठी 131 रुग्णालयांमधून महात्मा फुले जीवनदायी योजनेतून उपचार करण्यात आले. त्यात 76 खासगी रुग्णालये होती.

हेही वाचा: जमीन घोटाळा प्रकरण: खडसेंच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

म्युकमायकोसिस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले होते. त्याच धर्तीवर दुसऱ्या लाटेमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढले. त्यामुळे या आजारावर नेमके कसे उपचार करावे, यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला.

म्युकरमोयकोसिस प्रतिबंधासाठी दिलेल्या सूचना

  • कोरोनाबाधीत रुग्णांना ऑक्सिजन आणि स्टेरॉईडस देताना डॉक्टरांनी दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली.

  • अतिदक्षता विभागात रुग्णांची कशा प्रकारे काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन

  • मधुमेह असणाऱ्या रुग्णांचे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याबद्दल सूचना

  • या दुर्मिळ आजाराबद्दल लोकजागृती करण्यास प्राधान्य

loading image
go to top