आंदोलनात संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नागपूर : दुधाला अधिक भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी नागपुरात आंदोलन करताना जय जवान जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचे आज हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. नागपुरात जय जवान, जय किसान संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन आज सकाळी केले होते. या वेळी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर फेकून केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 

कळमना भागातील प्रजापतीनगरात आंदोलन सुरू असताना शरद खेडीकर या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. शरद खेडीकर हे "जय जवान, जय किसान' या संघटनेचे उपाध्यक्षही होते. यामुळे येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 

Web Title: Death of the organization leader in the farmers movement