ह्रदयविकाराचे मृत्यू वाढले! ‘सहा’ नियम पाळा अन्‌ हार्टअटॅकचा धोका टाळा

ब्लडप्रेशर व शुगर असलेल्यांना ह्रदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. पोटात जळजळणे, धाप लागणे व वारंवार घाम येणे हे ह्रदयविकाराची लक्षणे आहेत. अशा रुग्णांनी दर सहा महिन्यांतून एकदा वैद्यकीय तपासण्या (ईसीजी) करून घ्यायला हव्यात.
Heart Attack
Heart Attacksakal

सोलापूर : ब्लडप्रेशर व शुगर असलेल्यांना ह्रदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. पोटात जळजळणे, धाप लागणे व वारंवार घाम येणे हे ह्रदयविकाराची लक्षणे आहेत. अशा रुग्णांनी दर सहा महिन्यांतून एकदा वैद्यकीय तपासण्या (ईसीजी) करून घ्यायला हव्यात.

Heart Attack
मोठी ब्रेकिंग! ग्लोबल टिचर डिसले गुरूजींचा राजीनामा

स्पर्धेच्या युगात लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वयाच्या ३० वर्षांनंतर आपल्याकडे गाडी, बंगला असावा, असे प्रत्येकालाच वाटू लागले आहे. अशावेळी अनेकजण झोप, जेवणाकडे दुर्लक्ष करतात आणि धुम्रपानाच्या आहारी जातात. तंबाखू, मावा खातात, मद्यपान करतात आणि त्यामुळेच ह्रदयविकाराचा धोका संभवतो. त्यामुळे पोटात जळजळ होत असल्यास त्याला अपचन न समजता तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शारीरिक तपासण्या करून घेणे अत्यावश्यक आहे. ब्लडप्रेशर (बीपी) व शुगर असलेल्यांसाठी मद्यपान किंवा धुम्रपान करणे अत्यंत धोकादायक मानले जाते. त्यांनी ‘जीभेला जे आवडते ते खाण्याचा मोह टाळायला हवा, अन्यथा जगण्याचा त्यांचा संघर्ष सुरुच राहील’, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, ज्यांच्या घरातील अनेकांना ह्रदयविकाराचा त्रास झाला आहे, त्यांनी प्रत्येक सहा महिन्यांला वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यकच आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. ताणतणाव, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यामुळेच ह्रदयविकाराचे मृत्यू वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकांनी तणावमुक्त जीवन जगायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

Heart Attack
'तो' व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

तणावमुक्त जीवन जगा

वयाची तिशी ओलांडल्यानंतर प्रत्येकांनी त्यांच्या वाढदिनी व दिवाळीत (सहा महिन्यातून एकदा) वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. ब्लडप्रेशर, शुगर असलेल्यांनी तेल, तूप, दूध, साखर असे पांढरे पदार्थ खाणे टाळावे.

- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

Heart Attack
पत्नीच्या आजारपणामुळे ‘तो’ बनला चोर! ५२ व्या वर्षी चोरल्या १० दुचाकी

ह्रदविकार टाळण्यासाठी ‘हे’ कराच…

  • जीभेला आवडणारे पदार्थ खाणे टाळा अन्‌ जे आवडत नाहीत ते पदार्थ खा

  • दिसायला पांढरे असलेले पदार्थ (तेल, तूप, साखर, दूध, क्रिम) खाऊ नका

  • ताणतणाव टाळा आणि किमान सात-आठ तास झोप घ्या, वेळेवर जेवण करा

  • ब्लडप्रेशर, शुगर असलेल्यांनी पायी चालावे (मॉर्निंग वॉक), पण वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या

  • जिना चढताना धाप लागते, पोटात जळजळ करत असल्यास तत्काळ वैद्यकीय तपासण्या कराव्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com