'अवनी'ला मारण्याचा निर्णय योग्यच : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

मुंबई : नरभक्षक अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापत आहे. याप्रकरणावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधींनीही राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''अवनी वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय योग्यच होता. तसेच याप्रकरणात वनमंत्री मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे'', असेही ते म्हणाले.

अवनी वाघिणीला मारल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणी मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, अवनी वाघिणीला ठार मारण्याचा वनविभागाचा निर्णय योग्यच होता. तसेच याप्रकरणी मुनगंटीवारांचा राजीनामा मागणे चुकीचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली. याशिवाय वाघिणीच्या प्रकरणात मनेका गांधी यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, येत्या मंत्रिमंडळ बैठकीत अवनीप्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे अवनीचा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: The decision to kill Avni is right Says Chief Minister Devendra Fadnavis