esakal | Coronavirus : कोरोनाग्रस्तांसाठी परिवहन विभागाकडून ३ दिवसांचे वेतन
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी संघटनेने प्रतिसाद देऊन ३ दिवसांचे वेतन (सुमारे १ कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

Coronavirus : कोरोनाग्रस्तांसाठी परिवहन विभागाकडून ३ दिवसांचे वेतन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी संघटनेने प्रतिसाद देऊन ३ दिवसांचे वेतन (सुमारे १ कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या व्यतिरिक्त काही सभासदांनी उत्स्फूर्तपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी असलेल्या खात्यामध्ये भरीव रक्कम या अगोदरच हस्तांतरित केली आहे. यासंदर्भातील पत्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज (ता.३०) परब यांनी सुपूर्द केले. 

Coronavirus : क्वारंटाईन म्हणजे नेमकं काय? ते केल्याने काय होईल?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाय योजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे मोटार वाहन अधिकारी संघटनेने जाहीर केले. परब म्हणाले, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जगभर पसरलेल्या या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात देखील पसरत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यासंदर्भातील योग्य त्या सूचना वेळोवेळी परिवहन विभागाला देण्यात येत आहेत असेही परब यांनी यावेळी संगितले.