दूध उत्पादकांसाठी खुषखबर ! "या' तारखेपर्यंत प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा होणार निर्णय 

तात्या लांडगे 
Sunday, 26 July 2020

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील दुधाची विक्री कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर दूध अतिरिक्‍त झाले. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सहकारी दूध संघांकडील सहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची मुदत 31 जुलैला संपणार असल्याने शिल्लक दुधाचे काय करायचे, असा प्रश्‍न दूध उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे खासगी दूध संघांकडील सुमारे 20 लाख लिटरपर्यंत दूध दररोज अतिरिक्‍त होत असून त्यांना किमान दराने दुधाची विक्री करावी लागत आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे दूध विक्रीत मोठी घट झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. 

सोलापूर : राज्यात सद्य:स्थितीत आठ हजार 640 कोटींची 48 हजार मे. टन दूध भुकटी विक्रीविना पडून आहे. तरीही केंद्र सरकारने परदेशातून 10 हजार मेट्रिक टन भुकटी आयातीचा निर्णय 23 जूनला घेतला. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान तर केंद्र सरकारने भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपयांचे निर्यात अनुदान द्यावे; अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. त्यावर राज्य सरकारने पाच ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याचे श्री. शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा : मोठी ब्रेकिंग ! कडक संचारबंदी उठल्यानंतर शेतमालासह अन्य मालाची खरेदी शहराबाहेरच; "या' ठिकाणी केली सोय 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील दुधाची विक्री कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर दूध अतिरिक्‍त झाले. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सहकारी दूध संघांकडील सहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याची मुदत 31 जुलैला संपणार असल्याने शिल्लक दुधाचे काय करायचे, असा प्रश्‍न दूध उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे खासगी दूध संघांकडील सुमारे 20 लाख लिटरपर्यंत दूध दररोज अतिरिक्‍त होत असून त्यांना किमान दराने दुधाची विक्री करावी लागत आहे. दरम्यान, लॉकडाउनमुळे दूध विक्रीत मोठी घट झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. त्यावर पुढील महिन्यात निर्णय होणार असून राज्यातील 46 लाख शेतकऱ्यांसाठी किती रक्‍कम द्यावी लागेल, त्याची जुळवाजुळव कशी करायची, याचे नियोजन शासन स्तरावर सुरू असल्याचे दुग्ध आयुक्‍तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हेही वाचा : सोलापूर शहरात कोरोनाचा हल्ला कर्त्या व्यक्तींवरच 

लॉकडाउनमुळे वाढले अतिरिक्त दूध 
राज्यातील 33 दूध भुकटी प्रकल्पांमधून सुमारे 40 हजारांहून अधिक टन दूध भुकटी तयार केली आहे. लॉकडाउनमुळे दूध विक्रीसह भुकटीचीही अपेक्षित विक्री झाली नाही. त्यामुळे दूध दरवाढ करावी आणि भुकटीला प्रतिक्‍विंटल 50 रुपयांचे अनुदान द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यावर शासन स्तरावरून निर्णय अपेक्षित आहे, असे दुग्ध उपायुक्त श्रीकांत शिपूरकर यांनी सांगितले. 

दुधाची राज्यातील स्थिती 

  • दररोजचे दूध संकलन : 1.22 कोटी लिटर 
  • खासगी दूध संघांचे संकलन : 77 लाख लिटर 
  • सरकारी दूध संघांचे संकलन : 45 लाख लिटर 
  • दररोजचे अतिरिक्‍त दूध : 24 लाख लिटर 
  • शिल्लक दूध भुकटी : 48 हजार टन 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A decision to provide a subsidy of rs 5 per liter to milk producers will be taken soon