मतदानाची घटणारी टक्केवारी कोणासाठी डोकेदुखी? 2014 व 2019 च्या दोन्ही निवडणुकीत माढ्यात 36 टक्के तर सोलापूर मतदारसंघात 42 टक्के मतदान कमी; खासदार कोण, मतदारांमध्ये लागल्या पैजा

आता कडक उन्हाळा, दुष्काळी स्थिती असल्याने मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनासह अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, घटणारी किंवा वाढणारी मतदानाची टक्केवारी कोणत्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरणार, याचा अंदाज बांधला जात आहे.
मतदान
मतदानsolapur

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात २० लाखांवर तर माढा लोकसभा मतदारसंघात १९ लाख ८१ हजारांवर मतदान आहेत. मात्र, २०१४ व २०१९ मधील दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीत माढा मतदारसंघात ३६ टक्के तर सोलापूर मतदारसंघात सरासरी ४२ टक्के मतदान कमी झाले. आता कडक उन्हाळा, दुष्काळी स्थिती असल्याने मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनासह अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, घटणारी किंवा वाढणारी मतदानाची टक्केवारी कोणत्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरणार, याचा अंदाज बांधला जात आहे.

२०१४ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील दहा लाख ७७ हजार ९६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी तब्बल ३६.२९ टक्के मतदारांनी मतदानच केले नाही. तर २०१९मध्ये या मतदारसंघातून पावणेदोन लाख मतदान वाढले आणि मागील निवडणुकीत एकूण १२ लाख दहा हजार ७३३ मतदारांनी मतदान केले होते. पण, मतदानाची टक्केवारी ६५ टक्क्यांवर पोचली नाही.

२०१४मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तर २०१९च्या निवडणुकीत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मोहिते-पाटलांच्या मदतीने विजय मिळविला होता. दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी २०१४मध्ये १६ लाख ९९ हजार ८४० पैकी साडेसात लाख मतदारांनी मतदानच केले नव्हते. तर २०१९ च्या निवडणुकीत सात लाख ६८ हजार ६१६ मतदारांनी मतदान केले नाही. दोन्हीवेळा सोलापूर मतदारसंघातून भाजपनेच बाजी मारली.

२०१४ मधील मतदानाची टक्केवारी

  • माढा टक्केवारी सोलापूर टक्केवारी

  • करमाळा ६१ मोहोळ ६२.५३

  • माढा ६८.९७ शहर उत्तर ५३.२१

  • सांगोला ६३.३३ शहर मध्य ५५.४४

  • माळशिरस ६८.६१ अक्कलकोट ५४.९२

  • फलटण ६८.६१ दक्षिण सोलापूर ५१.८८

  • माण ६५.४८ पंढरपूर ५७.२७

  • एकूण ६३.७१ ६ ५५.८८

२०१९मधील मतदानाची टक्केवारी

  • माढा टक्केवारी सोलापूर टक्केवारी

  • करमाळा ६२.३१ मोहोळ ६४.०८

  • माढा ६९.५३ शहर उत्तर ५८.६९

  • सांगोला ६४.२० शहर मध्य ५५.१०

  • माळशिरस ६४.९५ अक्कलकोट ५६.८६

  • फलटण ६३.५८ दक्षिण सोलापूर ५६.४९

  • माण ५७.०७ पंढरपूर ५९.४४

  • एकूण ६३.४४ ६ ५८.४५

आपला खासदार कोण, मतदारांमध्ये लागल्या पैजा

२०१४मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते- पाटील हे खासदार झाले होते. आता या मतदारसंघात मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडली आहे, पण भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासमोर धैर्यशील मोहिते-पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने उमेदवार बदलला असून त्याठिकाणी आमदार राम सातपुते तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहेत. मागील दोन्ही निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून सव्वा ते दीड लाख मताधिक्यांनी भाजपचेच उमेदवार विजयी झाले आहेत. आता दोन्ही मतदारसंघाचे खासदार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अनेकांनी त्यावर पैजा लावल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com