
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषेदेत त्यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत एक वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे जे ठरवतील ते मान्य असेल. लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांचा निर्णय कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा लागेल. बजेटमध्ये ते मांडावे लागेल. १५०० ची बजेटमध्ये घोषणा केली होती. त्यानंतर ती मिळाली. उपमुख्यमंत्री व्हावं की नाही हा एकनाथ शिंदेचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदे महायुतीसोबत नेहमी असणार, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे.