Deepak Kesarkar : दीपक केसरकरांना पोस्टाने पाठवली जात आहेत कडधान्याची पाकिटं; भाजपही आक्रमक, काय आहे कारण?

मंत्री दीपक केसरकर यांना कडधान्याची पाकिटं पोस्टाने पाठवली जात आहेत. हे एक आंदोलन सुरु आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal

मुंबईः मंत्री दीपक केसरकर यांना कडधान्याची पाकिटं पोस्टाने पाठवली जात आहेत. हे एक आंदोलन सुरु आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. त्याचं कारण शालेय शिक्षण विभागाने मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याचा घेतलेला निर्णय. भाजप जैन सेलचा या निर्णयाला तीव्र विरोध दिसून येत आहे.

Deepak Kesarkar
अजित पवार गटाची विदर्भातील 10 पैकी 3 जागांवर नजर; भाजप खासदार असलेल्या 'या' जागांवर सांगितला दावा

शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध म्हणून भाजप जैन सेलकडून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कडधान्याची पाकिटं पाठवली जात आहेत. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना ही कडधान्याची पाकिटं पाठवली आहेत.

मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंड वितरित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी भाजप जैन सेलचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येनं कडधान्याची पाकीट पाठवण्यात येणार असल्याचाही इशारा संदीप भंडारी यांनी दिला आहे.

Deepak Kesarkar
Explainer: निवडणुकीला 24 तास.. विरोधकांचा बहिष्कार.. लष्कर रस्त्यावर; बांगलादेशमध्ये काय सुरुंय? भारताचा काय संबंध?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरड धान्यावर विशेष भर देण्याच्या निर्णयाला मंत्री दीपक केसरकर मान्य करत नाहीत का? असाही प्रश्न भाजप जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केला आहे. सरकारमधील एका मंत्र्याच्या विरोधात भाजपचेच लोक आंदोल करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) पत्रव्यवहार केला आहे. स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अंडी व फळे विकत घ्यायची आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चापोटी प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रुपये, याप्रमाणे अग्रिम दिला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com