Kolhapur Flood : 'शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरातील पूर टळला'; मंत्री केसरकरांचं वक्तव्य चर्चेत

Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal
Updated on

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर शहरातील पुराबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरात पूर आला नाही असा दावा त्यांनी केला आहे. याला श्रद्ध म्हणा की अंधश्रद्धा असेही केसरकर यावेळी म्हणाले.

केसरकर म्हणाले की, अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा काहीही म्हणा. पण ज्या दिवशी पुराची स्थिती होती त्या दिवशी मी योगायोगाने शिर्डीला होता. कोल्हापूरात राधानगरीचं पाणी सोडल्यानंतर पाच फुटाने पाण्याची पातळी वाढते हे सगळ्यांना माहितेय. पण या खेपेला एक फुटाने सुद्धा पातळी वाढलं नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही कन्फर्म करु शकता. हे नॉलेज, कॅलक्युलेशन आहे..

मी स्वतः तिथे ठाण मांडून होतो, तेथे असताना आपण देवाला प्रार्थना करतो की हे संकट जाऊदे. त्या प्रार्थनेत देखील ताकद असते. तुम्ही कॅलक्युलेशन जाऊन बघा. खरोखर पाच-सहा फुट पाणी आलं असतं तर बरीचशी गावे पाण्याखाली गेली असती, असेही केसरकर यावेळी म्हणाले.

Deepak Kesarkar
Sambhaji Bhide Controversy : भिडेंवर कठोर कारवाई का होत नाही? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

दीपक केसरकर यांनी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. केसरकर म्हणाले की, मी त्यांना गड किल्ले यासंदर्भात ओळखतो. त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करणे थांबवावे. पण वयामुळे असं होत असेल. गृहमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही त्यांचं वक्तव्य तपासून पाहू. मी भेट झाल्यावर त्यांना (संभाजी भिडे) सांगेल. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे देशाला दुःख होतं, त्यांनी इतर विषयांवर भाष्य करू नये, अशी माझी नम्र विनंती आहे असेही केसरकर म्हणाले.

Deepak Kesarkar
Sambhaji Bhide Controversy : भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, 'अशा वक्तव्यामुळे संताप...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Akola
Flood Risk Looms Large Over Hinjewadi as Civic Works Remain Unfinished
India first transgender flood rescue team
Shaktipeeth Highway Controversy raju shetti in kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com