नारायण राणेंची तक्रार मोदींकडे केलीच नाही; केसरकरांचा 'यु-टर्न' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar and Narayan Rane

नारायण राणेंची तक्रार मोदींकडे केलीच नाही; केसरकरांचा 'यु-टर्न'

मुंबई - एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज मोठा युटर्न घेतल्याचं पाहायला मिळालं. आमदार केसरकर शिंदे गटाची बाजू लावून धरत शिवसेनेच्या टीकांना चोख प्रत्युत्तर देत होते. मात्र केसरकर यांनी शुक्रवारी केलेल्या अनेक गौप्यस्फोटानंतर त्यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आज केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच आपण यापुढे पत्रकार परिषदेत कधीही राणे यांचे नाव घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. (Deepak Kesarkar news in Marathi)

हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार राज्याचा दौरा

आज केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की, आपण यापुढे पत्रकार परिषदेत कधीही नारायण राणे यांचं नाव घेणार नाही. तसेच पंतप्रधान मोदींकडे मी कधीही राणे यांची तक्रार केली नाही. व्यक्तीगत पातळीवर केलेल्या तक्रारीवर कधीही लक्ष दिल जात नाही.

केसरकर शुक्रवारी म्हणाले होते की, आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणे यांनी आखला होता. याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीनआस्मानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता.

हेही वाचा: तुम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्हायचं अन् बाकीच्यांच काय? अजित पवार संतापले

ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्य़ेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असंही केसरकर म्हणाल होते. मी कधीही पवार साहेब यांच्यावर टीका करत नाही. एनसीपी असं वापरतो. आता माझ्या लक्षात आलं असून मी यापुढे कधीही राणे यांचं नाव घेणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान केसरकरांनी केलेल्या आरोपानंतर आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपकडून आलेल्या दबावामुळेच तर केसरकर यांनी युटर्न घेतला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर नितेश राणे यांनी सावध भूमिका घेत हिंदुत्वासाठी सर्वकाही माफ असल्याचं म्हटलं.

Web Title: Deepak Kesarkars U Turn On Stetment About Narayan Rane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..