esakal | गुगलमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि ड्रग केसची सर्वाधिक सर्चिंग
sakal

बोलून बातमी शोधा

0deepika_20padukone_20shraddha_20kapoor_20and_20sara_20ali_20khans_20mobile_20seized_20by_20ncb.jpg

*एसएसआर ड्रग्स केस नावाने मुंबई, पुण्यात सर्वाधिक सर्च
*दीपिकाच्या नावाने दिल्ली, कर्नाटकात सर्वाधिक सर्च
*सारा अली खानच्या नावाने महाराष्ट्रात सर्चिंग

गुगलमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि ड्रग केसची सर्वाधिक सर्चिंग

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद  : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवुड, ड्रग्स आणि अभिनेत्री सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. ता.२० ते २७ सप्टेंबरदरम्यान गुगल सर्चमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग, ड्रग्स, बॉलिवूड, ऑनलाइन चॅट, इंडियन फिल्म ॲक्ट्रेसेस नावाने सर्वाधिक सर्चिंग होत आहे.

‘एसएसआर ड्रग्स केस’ नावाने म्हणजेच सुशांतसिंह राजपूत ड्रग्स केस नावाने मुंबई, पुण्यातून सर्वाधिक सर्च झाले. ‘दीपिका पदुकोण चॅट ड्रग्स’ नावाने सर्वाधिक सर्च दिल्ली, कर्नाटकमधून झाले, तर ‘सारा अली खान ड्रग्स चॅट’ नावाने महाराष्ट्रातून सर्वाधिक सर्च झाले आहे.

औरंगाबाद : कोरोना रुग्णाची घाटीच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र बॉलिवूड मधील ड्रग्सची चर्चा सुरू आहे. रिया चक्रवर्तीनंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग यांची नावे पुढे आल्यानंतर आता गुगलवर या अभिनेत्र्यांच्या नावाने सर्चिंग वाढले आहे. मागील सात दिवसांत दीपिका पदुकोण चॅट ड्रग्स, दीपिका पदुकोण चॅट नावाने सर्वाधिक सर्च दिल्लीत झाले. यानंतर हरियाना, महाराष्ट्र, उत्तराखंडचा नंबर लागतो. ‘दीपिका पदुकोण ड्रग्स केस’ नावाने सर्वाधिक सर्च कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड, महाराष्ट्र, पंजाब राज्यात झाले आहे.


‘सारा अली खान चॅट’ नावाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून सर्वाधिक सर्च झाले आहे, तर रकुलप्रीत सिंग नावाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, अंदनाम निकोबार, ओडीसा, दिल्ली राज्यातून सर्वाधिक सर्च झाले आहे. श्रद्धा कपूर ड्रग्स केस नावाने दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातून सर्वांत जास्त सर्च झाले. सध्या गुगलवरील टॉपिक मध्ये समन्स, ऑनलाइन चॅट, इंडियन फिल्म ॲक्ट्रेसेस, बॉलिवूड, लिगल केस, सारा अली खान, बॉलिवूड ड्रग्स केस, ड्रग्स केस इन बॉलिवूड, एसएसआर ड्रग्स केस नावाने सर्चिंग होत आहे. सर्च करणारे यामध्ये फोटो, व्हीडीओ तसेच यातील अपडेट माहितीसाठी सर्च करत आहे.


संपादन - गणेश पिटेकर