बंग अहवालाच्या आधारे धोरण निश्‍चित करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - मेळघाटमधील कुपोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डॉ. अभय बंग यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने धोरण निश्‍चित करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. 

मुंबई - मेळघाटमधील कुपोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डॉ. अभय बंग यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने धोरण निश्‍चित करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. 

सामाजिक कार्यकर्त्या सिमांतिनी धुरू यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. बंग यांनी या वेळी कुपोषणाच्या निवारणासाठी उपाययोजनांसंदर्भातील अहवाल सादर केला. आदिवासी भागांतील सेवेत रुजू न होणाऱ्या डॉक्‍टरांवर सरकारने कठोर कारवाई करायवी, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांवरही जबाबदारी द्यायला हवी, असे बंग यांनी सांगितले. संबंधित समितीने बंग यांच्या अहवालाचा अभ्यास करून धोरण निश्‍चित करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी 15 जूनला होणार आहे. 

Web Title: Define the strategy based on the Banga Report