
सोमेश्वरनगर, (जि. पुणे) - राज्यभरात नोव्हेंबरच्या पंधरवड्यात रेंगाळलेल्या गाळप हंगामाने डिसेंबरमध्ये वेग घेतला आहे. राज्यातील ४६ कारखाने अजूनही बंद आहेत. दरम्यान, सुरू झालेल्या १५६ कारखान्यांनी १४६ लाख टन ऊसगाळप करत ११ लाख ५० हजार टन साखरनिर्मिती केली आहे.