बच्चू कडू यांच्यावर कारवाईची मागणी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - अमरावती विभागातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या अनुदानाचे पैसे का दिले जात नसल्याचा जाब प्रशासनाला विचारणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मंत्रालय अधिकारी महासंघाने केली. अधिकारी आणि कर्मचारी यांना वारंवार मारहाण करून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कडू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे. आमदार कडू यांनी शेतकऱ्यांचे गेल्या चार वर्षांपासून थकीत असलेल्या ठिबक सिंचन अनुदानाची रक्कम अदा का केली गेली नाही, असा जाब राज्याचे कृषी प्रधान सचिव विजय कुमार यांना विचारला.

मुंबई - अमरावती विभागातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाच्या अनुदानाचे पैसे का दिले जात नसल्याचा जाब प्रशासनाला विचारणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मंत्रालय अधिकारी महासंघाने केली. अधिकारी आणि कर्मचारी यांना वारंवार मारहाण करून वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या कडू यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे. आमदार कडू यांनी शेतकऱ्यांचे गेल्या चार वर्षांपासून थकीत असलेल्या ठिबक सिंचन अनुदानाची रक्कम अदा का केली गेली नाही, असा जाब राज्याचे कृषी प्रधान सचिव विजय कुमार यांना विचारला. जोपर्यंत या संदर्भात ठोस लेखी स्वरूपात ग्वाही देत नाही तोवर आपण दालनात बसून राहू, असा पवित्रा घेतला. मात्र, आमदार कडू यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविला असता, आमदार कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंत्रालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. गैरकृत्य करायला कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना भाग पाडले. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करत आमदार कडू यांच्यावर कारवाई केली नाही तर आंदोलन उग्र करू, असा इशाराही कर्मचारी संघटनेने दिला आहे. 

Web Title: Demand action against bacchu kadu