लोकशाही पुरस्कारांचे शनिवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 जुलै 2019

राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रदान करण्यात येणारे पहिले लोकशाही पुरस्कार जाहीर झाले असून उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे शनिवारी (ता. 27 जुलै 2019) रोजी वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

मुंबई - राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रदान करण्यात येणारे पहिले लोकशाही पुरस्कार जाहीर झाले असून उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे शनिवारी (ता. 27 जुलै 2019) रोजी वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
सहारिया यांनी सांगितले की, मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन 2016 आणि 2017 या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या सहा गटात एकूण 14 पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

गटनिहाय पुरस्कार विजेत्यांची नावे अशी
- निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे- माथेरान हॉटेल असोसिएशन, मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्‌, मुंबई विद्यापीठ, मुंबई, रिसोर्स ×ण्ड सपोट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट आणि संदीप भास्कर जाधव, सोलापूर.
- निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे- डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली, श्रीमती दया अर्जुन डोईफोडे, पोलिस हेड कॉन्सटेबल, कराड आणि केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगरपरिषद.
- निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती- गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे. निवडणूक प्रक्रियेत संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन.
- निवडणुकांमध्ये मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढविणे- बृहन्मुंबई महानगरपालिका. निवडणुका सुरळीत पार पाडणे,
- निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर करणे आणि मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ- ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Democracy Award Distribution Vice President Distribution