'साम'वर आज 'नोटबंदीवरची जाहीर सभा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

ट्‌विटरवरही #Notekibat हा हॅशटॅग वापरून तुम्ही तुमचा सहभाग आणि मत नोंदवू शकता. तसेच साम टीव्हीच्या टोल फ्री क्रमांकांवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही मत नोंदवू शकता. नोटबंदीला पाठिंबा दर्शविणाऱ्यांनी 18003157098 क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, तर नोटबंदीला विरोध दर्शविणाऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 18003157099 वर मिस्ड कॉल करावा.

मुंबई : नोटबंदीवर सर्वसामान्यांना काय वाटतेय, यासाठीचे व्यासपीठ साम टीव्हीने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. सामवर "नोटबंदीवरची जाहीर सभा' आज (ता. 26) थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.

आवाज महाराष्ट्र या कार्यक्रमात रात्री आठ वाजता टीव्हीविश्वातील हा पहिलावहिला "लाइव्ह पब्लिक डिबेट' होणार आहे. या डिबेट शोमध्ये आपण सहभागी होऊ शकता. यात एकीकडे नोटबंदीला विरोध करणारे आणि दुसरीकडे नोटबंदीला पाठिंबा देणारे सर्वसामान्य नागरिक आपापली मते मांडतील. साम टीव्हीचे संपादक संजय आवटे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.

या पब्लिक डिबेटमध्ये थेट सहभागी होण्यासाठी साम टीव्हीच्या 8888849034 या मोबाईल क्रमांकावर तुम्ही व्हॉट्‌सऍप करून तुमचा सहभाग नोंदवू शकता. या मेसेजमध्ये तुम्ही नाव, ठिकाण आणि तुमचा नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा किंवा विरोध आम्हाला कळवा. त्यानुसार तुम्हाला साम टीव्हीच्या नवी मुंबई येथील बेलापूर स्टुडिओतून या कार्यक्रमात थेट सहभागी होता येईल. 

ट्‌विटरवरही #Notekibat हा हॅशटॅग वापरून तुम्ही तुमचा सहभाग आणि मत नोंदवू शकता. तसेच साम टीव्हीच्या टोल फ्री क्रमांकांवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही मत नोंदवू शकता. नोटबंदीला पाठिंबा दर्शविणाऱ्यांनी 18003157098 क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, तर नोटबंदीला विरोध दर्शविणाऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 18003157099 वर मिस्ड कॉल करावा.

Web Title: demonitisation debate show on Saam tv