
सकाळ समुहाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी दिलखुलासपणे अनेक विषयांवर मत मांडले आहे. अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. हा आमचा निर्धार आहे. या योजनेसासाठी ४० ते ४५ हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच बरोबर काटकसर देखील आम्ही करत आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितले आहे.