Ajit Pawar: अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, पण...; देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?

ajit pawar devendra fadnavis
ajit pawar devendra fadnavisesakal
Updated on

मुंबई- शासकीय यंत्रणांना घाबरुन राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये गेल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. याबाबत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्यांच्याकडे कबुली दिल्याचं पवार म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. शरद पवारांचा आरोप खोटा असल्याचं ते म्हणाले आहेत.

२०१९ मध्ये शरद पवार यांनी आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते. त्यामुळे ते कोणत्या यंत्रणांना घाबरुन आमच्यासोबत येणार होते का? २०१७ मध्येही त्यांनी आमच्यासोबत येण्यासाठी चर्चा केली होती. त्यामुळे तेव्हा त्यांच्यावर कोणत्या यंत्रणांचा दबाव होता का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

ajit pawar devendra fadnavis
अजित पवार सत्तेबाबत नाराज

राष्ट्रवादीतील नेते बाहेर का पडले हे शरद पवारांना नीट माहिती आहे. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलंय की आमचं सरकार बदललं तेव्हा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या संमतीने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता यावर बोलणे चुकीचे आहे, असं फडणवीस म्हणाले.

ajit pawar devendra fadnavis
NCP Crisis: राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगात उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू मांडणार 'हे' वकील

अजित पवारांना शुभेच्छा

जो राजकारणात आहे. त्यांना कधी ना कधी संधी मिळणार आहे. अजित पवार त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. पण, वास्तविकता ही आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाश शिंदे मुख्यमंत्री असतानाच निवडणूक लढवली जाणार आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

शिंदे दिल्लीला कशासाठी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहेत. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, 'दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आहे. त्यामुळे ते देशाच्या राजधानीमध्ये गेले आहेत.' राष्ट्रपती शासन लागू करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. मी जे सत्य आहे तेच सांगतोय असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com