आमचा कुणी सुपर CM नाही, आमचे एकच CM ते म्हणजे एकनाथ शिंदे - फडणवीस

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती नाही असं मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDevendra Fadnavis

मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराला स्थगिती नाही असं मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला सुद्धा दि.बा. पाटलांचं नाव देण्यावर स्थगिती नाही असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आमचा कोणीही सुपर मुख्यमंत्री नसून एकच मुख्यमंत्री आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde). तेच आमचे प्रमुख असतात आणि तेच आमचे नेते असतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

(Deputy CM Devendra Fadnavis News)

दरम्यान, आज फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊधाण आलं होतं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की त्यांचे ऑपरेशन झाले आहे त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

त्यानंतर अमित ठाकरे यांना मंत्रिपद देणार, मी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी दिली, त्यांच्याकडील माईक हिसकावून घेतला अशा बातम्या दिल्या जात आहेत पण मी माझ्या मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी देऊ नये का? त्यात काय गैर वाटतं? आणि ज्यावेळी मी माईक घेतला तेव्हा मला प्रश्न विचारण्यात आला होता त्यामुळे मी माईक घेतला पण तुमच्याकडून गैरसमज पसरवले जातात असं फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis
"शिवसेनेचा कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही" - सत्तार

"कुठल्याही सरकारमध्ये सुपर मुख्यमंत्री नावाचा व्यक्ती नसतो. तसंच आमच्या सरकारमध्येही एकच मुख्यमंत्री आहेत. तेच आमचे सगळ्याचे नेते आहेत आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. पण टीका करणाऱ्यांना ते बघवत नाही." असं टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान, त्यांनी यावेळी बोलताना आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय हे अल्पमत असल्यामुळे बेकायदेशी होते. पण आता आम्ही नव्याने त्या निर्णयाची घोषणा करणार आहोत. त्यामुळे औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव दि.बा.पाटील या नामांतराची आम्ही उद्या घोषणा करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com