
Maharashtra Election Marathi News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात मतदान यंत्रातील घोटाळ्यांवर बरीच चर्चा झाली होती. याबाबत अनेक गैरप्रकारांचे पुरावे आणले गेले होते, तसंच निवडणूक आयोगाकडं याबाबत रीतसर तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. या तक्रारींवर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तरं दिली आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या मुद्द्यांवर भूमिका मांडली.