
देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...
मुंबई : महाराष्ट्रातील फार मोठ्या साहित्यिकांनी पुस्तकात सांगितले आहे की, हिंदुत्वाची शाल कोणी पांघरली आहे आणि खर हिंदुत्व कोणाच्या रक्तात आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. मी तुम्हाला माहिती देईल. मी कोणाला बोललो आहे हे त्यांनाही समजले आहे आणि जनतेलाही समजले आहे, असा टोला विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendara fadanvis) यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाणला. (devendara fadanvis said, We will expose mahavikas aaghadi corruption)
मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलखोल अभियानाला मंगळवारी (ता. १९) सुरुवात होणार होती. मात्र, त्याआधी अज्ञातांनी या रथाची तोडफोड केली. कितीही हल्ले करा आम्ही महाविकास आघाडीचा (mahavikas aaghadi) भ्रष्टाचार बाहेर काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (devendara fadanvis) यांनी दिली.
हेही वाचा: पतीला अनैसर्गिक संबंधाचे व्यसन; पत्नीने विरोध केल्यास...
मंगळवारी मुंबईतील चेंबूर परिसर इथल्या भाजप कार्यालयात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत पोलखोल रथयात्रेला सुरुवात होणार होती. मात्र, रथयात्रेच्या आदल्या रात्री अज्ञात व्यक्तीने भाजपच्या रथाची तोडफोड करून नुकसान केले. यामुळे रथयात्रेला सुरुवात झाली नाही.
अज्ञाताकडून दगड मारून रथाच्या काचा फोडण्यात आल्या. ही तोडफोड महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला. गाडीची तोडफोड करणाऱ्या चार जणांची ओळख मुंबई पोलिसांनी कोली आहे. पोलिस या चार संशयितांचा शोध घेत आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकीवरील क्रमांकाची ओळख पटवली जात आहे.
हेही वाचा: सोनिया गांधींनी घेतली बैठक; प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावाबाबत असंतोष
भ्रष्टाचाऱ्यांना अस्वस्थ वाटत आहे
असे असताना आमच्यावर कितीही हल्ले करा आम्ही महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमच्या रथावर दगडफेक होणे अपेक्षितच होते. आमचा घाव सत्ताधाऱ्यांच्या वर्मी बसला म्हणूनच हा हल्ला करण्यात आला आहे. भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने भ्रष्टाचाऱ्यांना (corruption) अस्वस्थ वाटत आहे, असेही देवेंद्र फडणवीस (devendara fadanvis) म्हणाले.
Web Title: Devendara Fadanvis Said We Will Expose Mahavikas Aaghadi Corruption
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..