पतीला अनैसर्गिक संबंधाचे व्यसन; पत्नीने विरोध केल्यास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unnatural relationship and Abuse of wife

पतीला अनैसर्गिक संबंधाचे व्यसन; पत्नीने विरोध केल्यास...

पतीने आपल्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural relationship) ठेवले. संबंधास विरोध केला तर बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर विरोध केल्यावर पती इलेक्ट्रिक शॉक देतो, असा आरोप पत्नीने केला आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली. (Unnatural relationship and Abuse of wife)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना जिल्ह्यातील २६ वर्षीय महिलेचा विवाह ग्वाल्हेरच्या बारागाव येथील रहिवासी इक्बालसोबत २०२१ मध्ये झाला होता. लग्नानंतर सासरच्या घरी पोहोचल्यापासून पतीच्या क्रौर्याचा सामना (Unnatural relationship) करावा लागत असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. पती लग्नानंतर अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. अयोग्य पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला तर पती मारहाण करतो. एक वर्षापासून पती असा अत्याचार करीत असल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा: सोनिया गांधींनी घेतली बैठक; प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावाबाबत असंतोष

अनैसर्गिक सेक्सला विरोध केला तेव्हा पतीने अतिशय वाईट वर्तन (Abuse of wife) केले. एकदा ही बाब आईला सांगितली. याची माहिती पतीला झाली तेव्हा पतीने क्रूरतेची हद्द ओलांडली. माझ्या पतीला अनैसर्गिक सेक्स करण्याची सवय आहे. अशाच पद्धतीने सेक्स (Unnatural relationship) करायला पतीला आवडते. यामुळे कंटाळल्यावर पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी पतीचा शोध पोलिस घेत आहे.

Web Title: Unnatural Relationship Abuse Of Wife Crime News Madhya Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..