फडणवीस घेणार 5 नोव्हेंबरला वानखेडेवर मुख्यमंत्रीपदाची शपथ?

Devendra Fadanvis may take oath as CM on 5th November at Wankhede Stadium
Devendra Fadanvis may take oath as CM on 5th November at Wankhede Stadium
Updated on

मुंबई : भाजपने 2014मध्ये प्रथम सत्तास्थापन करण्याचे निश्चित केले होते, त्याचप्रमाणे आताही भाजची सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा येत्या 5 नोव्हेंबरला संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ वानखेडे स्टेडियम येथेच होणार असून या भव्यदिव्य शपथविधी समारंभ आयोजित करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आ. प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपविली आहे. या समारंभाची जय्यत तयारीही या दोघांनी सुरू केली असल्याचे या प्रक्रियेतील विश्वासू सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला आहे. यात भाजप सर्वाधिक जागेवर विजय प्राप्त करून मोठा पक्ष ठरला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आडमुठी भूमिका घेत असल्याने निकाल हाती येऊन आठवडा उलटला तरी सरकार स्थापन झाले नाही.  मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजपमध्ये अद्यापही "आम्हचाच मुख्यमंत्री" या मागणीवर घोडे अडले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत असून तत्पूर्वी सरकार गठीत करणे महत्वाचे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आडमुठी भूमिकेकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी करण्याचा 'प्लॅन बी' भाजपने आखला आहे. त्यामुळे 2014 मध्ये ज्या पद्धतीने भाजपने प्रथम सत्ता स्थापन करून नंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले, त्याच पद्धतीने पुढे जाण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी  तयारी सुरु केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असून त्यांच्यासोबत भाजपचे अन्य काही मोजके नेतेही मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू आ. प्रसाद लाड आणि प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार त्यांनी प्राथमिक तयारीही सुरू केली असल्याची माहिती मिळाली असून येत्या मंगळवारी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेदरम्यान शपथविधी समारंभ पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com