सेनेच्या हातात घड्याळ? भाजपला शह देण्यासाठी हालचाली वेगात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

राज्यात सत्ता कुणाची स्थापन होणार याबाबत सध्या वेगवेगळे तर्क लढवले जातायत. सत्तेत समान वाट्याच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत तणावाची स्थिती आहे. त्यात विरोधकांनी भाजपला सत्तेत न आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे.

मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काल (ता. 31) शरद पवारांची भेट घेतली. तर आज (ता. 1) काँग्रेसचे नेते सोनिया गांधी यांना भेटून शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करतील. यामुळे महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठीची समीकरणं बदलतात की महायुतीचे सरकार येते यावर प्रश्नचिन्ह आहे.  

संजय राऊत म्हणताहेत, 'सिकंदरालाही माघार घ्यावी लागली होती!'

पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन खा. राऊत यांनी भेट घेतली. सध्या शिवसेना-भाजपमध्ये सत्ता समिकरणाचा तिढा सुरूच आहे. अडिच अडिच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. तसेच आजच्या सोनिया गांधींच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सत्ता कुणाची स्थापन होणार याबाबत सध्या वेगवेगळे तर्क लढवले जातायत. सत्तेत समान वाट्याच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत तणावाची स्थिती आहे. त्यात विरोधकांनी भाजपला सत्तेत न आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे.

संजय राऊत शरद पवार भेट, महाराष्ट्रातील नवी राजकीय समीकरणं ? 

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 50-50 च्या सूत्रावर बातचीत झाली नसल्याचं म्हणतायत. तर शिवसेनेकडून सत्तेत समसमान वाट्याचा पुनरुच्चार केला जातोय. यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एक विधान केलं गेलंय. शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सणसणीत विधान केलंय. 

तर, 'आम्ही गरज पडली तर बहुमत आणून दाखवू व सरकार स्थापन करून दाखवू' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच त्यांनी आज एक सूचक ट्विट करून भाजपला टोलाही लगावला आहे. 

साहिब... मत पालिए, अहंकार को इतना...
महायुतीचे हे वाद शिगेला पोहोचलेले असतानाच आज खा. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून खळबल उडवली आहे. 'साहिब... मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..!' असे ट्विट राऊतांनी केले आहे. हे ट्विट कोणत्याही व्यक्तीबाबत नसनू, ज्या गोष्टी मला पटतात त्या मी ट्विटरवर लिहितो असे उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

"कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही" असं उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या बैठकीत बोलले असल्याचं समजतंय. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीसाठी जीबत नरमली नाही हेच संकेत यातून मिळतात. तसेच काँग्रेसने शिवसेनेला हात दिला व राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक मिळाली तर ते सत्ता स्थापन करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of Congress and NCP supporting Shivsena to form government in Maharashtra