esakal | मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील लोकांना आधी शिकवावं - देवेंद्र फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षातील लोकांना आधी शिकवावं - फडणवीस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच राज्याचे माजी गृहमंत्री यांनी ईडीच्या चौकशीला सामोरं जावं असा सल्लाही दिला आहे. महाविकास आघाडी ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली असल्याचंही फडणवीस म्हणाले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ईडीने लूकआऊट नोटीस जारी केल्याचं मला आताच कळाले. कायद्याच्या दृष्टीने त्यांनी चौकशीला सामोरं जावं हेच योग्य होईल. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात याबाबत धाव घेऊन झाली आहे. आता चौकशीला सहकार्य करावं असा सल्ला फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा: शेट्टींना मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी निमंत्रण; आज दुपारी बैठक

मुख्यमंत्री काय बोलले यावर काही बोलणार नाही. समोरच्यांना बोलण्याऐवजी आपल्या पक्षातील लोकांना शिकवावं असाही टोला मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. महाविकास आघाडी ही सरकार चालवण्यासाठी तयार झालेली नाही. आघाडी तयार झालीय ही सत्तेचे लचके तोडण्यासाठी. प्रत्येकजण सरदार असल्यासारखं वागतोय. जर सत्तेचे लचके तोडता आले नाही तर एकमेकांचे लचके तोडा असंही फडणवीस यांनी म्हटलं.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा रविवारी (ता. पाच) परळीत दाखल झाल्या. दरम्यान, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल करत परळीत येऊन अनेकांचा भांडाफोड करणार असल्याचे करुणा यांनी म्हटले होते.

हेही वाचा: अनिल देशमुखांना अटक होणार?, ईडीची लूकआऊट नोटीस जारी

बीडमध्ये करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यापासून वंचित ठेवण्याचं कारण नाही. पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर मिळालेली पिस्तुल हे गंभीर आहे. कोणत्याही दबावाशिवाय करुणा शर्मा पिस्तुल प्रकऱणाची चौकशी झाली पाहिजे.

loading image
go to top