हाच तो दिवस... फडणवीसांच्या 'त्या' सरकारची आज 2 वर्षे!

fadnavis ajit pawar
fadnavis ajit pawaresakal

23 नोव्हेंबर 2019 हाच तो दिवस...स्थळ राजभवन..राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीने भारताच्या राजकारणात खळबळ माजवली होती. सगळीकडे एकच चर्चेचा विषय..तो म्हणजे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा पहाटेचा शपथविधी सोहळा...हा सोहळा अन् तो दिवस आजही चर्चेचा विषय आहे. या शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी..जाणून घ्या सविस्तर..

पहाटेच्या शपथविधीला 2 वर्षे पूर्ण

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governer bhagat singh koshyari) यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटे-पहाटे शपथ घेऊन अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देण्याच्या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाली. २०१९ साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली होती. अल्पवधीतीच सरकार कोसळलं अन् यामुळे देवेंद्र फडणवीस यांना टीकेचा सामना करावा लागला. आजही फडणवीस यांच्या मनात ही सल कायम आहे. जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचं बोलून दाखवलं आहे.

महाराष्ट्रात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

दोन परस्परविरोधी प्रतिनिधीत्व करणारे हे दोन नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्रात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला होता. २०१९ च्या निवडणुकी वेळी प्रचारादरम्यान मी पुन्हा येणार...अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळपास दीड महिने सरकार स्थापन होत नव्हतं. शिवसेना 50-50 फॉर्म्युलावर अडून बसली होती. यात मुख्य मुद्दा मुख्यमंत्रीपदाचा होता. त्यामुळे युतीत चर्चांची सत्र सुरू होती. भाजप सतत मातोश्रीसोबत चर्चा करत होतं. तर, मातोश्रीऐवजी संजय राऊत सगळ्या बातम्या थेट माध्यमांपर्यंत पोहोचवत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणार हे निश्चित झालं. यानंतर युतीत सर्वकाही अलबेल होऊन फडणवीस पुन्हा सत्तेत येतील, अशी अपेक्षा असतानाच भूकंप झाला.

fadnavis ajit pawar
''पुरावा दिला तर बक्षीस देईन'', मलिकांनी शेअर केला क्रांतीच्या चॅटचा स्क्रीनशॉट

शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच

राज्यात दीडशे जागा मिळणार असे भाजप नेते सांगत होते. पण त्यांना 105 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 145 आमदारांची आवश्यकता होती. भाजपने 152 जागा लढल्या होत्या. सत्तेतले त्यांचे भागिदार शिवसेनेने 124 जागी उमेदवार दिले होते. तर एनडीएतल्या मित्र पक्षांनी 12 जागा लढवल्या होत्या. शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले. शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठीची रस्सीखेच सुरु झाली. ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्षाचा मुख्यमंत्री होईल, असा दावा शिवसेनेनं केला. भाजपनं आम्हाला शब्द दिला होता, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. पण आपण असा शब्दच दिला नव्हता, असं भाजपकडून सांगण्यात आलं. हे सर्व सुरु असताना शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्या समिकरणाची निर्मिती झाली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरु झाली होती.

हे सर्व सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन पहाटे शपथविधी उरकला. पण हे सरकार फार काळ तग धरु शकलं नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला

fadnavis ajit pawar
चॅट्समध्ये दाऊदचा उल्लेख; क्रांती रेडकर दाखल करणार तक्रार

फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळलं होतं

त्यावेळी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळलं. अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार यांच्या गटाला १२ मंत्रीपदं आणि १५ महामंडळं दिली जातील असं त्यावेळी सांगण्यात येत होतं. मात्र अजित पवार यांनी काही तासांमध्ये राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता.

हा हवेत घेतलेला निर्णय नव्हता - फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला होता. हा हवेत घेतलेला निर्णय नव्हता” असे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२० साली एका वेबिनारमध्ये बोलताना म्हटलं होतं. “अजित पवारांनी स्वत: सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी आमदारांशी आमची चर्चा देखील घडवून आणली होती. त्यामुळे हा हवेत घेतलेला निर्णय नव्हता”, असं फडणवीस म्हणाले होते.बहुमताचा प्राथमिक अंदाजही न घेता राज्यपालांनी फडणवीस यांना शपथविधीसाठी पाचारण केले. पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आदल्या दिवशी रात्री सहमती झाली होती, असं यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीने यानंतर स्पष्ट केलं होतं.

अन् मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार विराजमान

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. यावर तडजोड करण्यास भाजपानं नकार दिला. शिवसेनेनं भाजपाला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला होता.वेळेत दोन्ही (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) पक्षांनी पाठिंबा न दिल्यानं शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही.अखेर या नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार विराजमान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com