विधिमंडळात गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजप सदस्यांचा सभात्याग 

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

विश्वास दर्शक ठरावाच्याच दिवशी भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

मुंबई : गेल्या वेळी सभागृहात राष्ट्रगीत झाल्यामुळं पुन्हा अधिवेशन घेण्यासाठी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात आली नाही. तसेच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली भाजप सदस्यांनी त्यांना पाठिंबा देत सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर फडणवीस यांच्यासह सर्व भाजप सदस्यांनी सभागृहातून त्याग केला. त्यामुळं भाजप सदस्यांशिवायच सभागृहात बहुमत चाचणी घेण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय म्हणाले फडणवीस?
विश्वास दर्शक ठरावाच्याच दिवशी भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीस यांना थांबवण्यात प्रयत्न केल्यानंतर 'मी संविधानातील मुद्दे मांडत आहे. जर मला तो अधिकार नसले तर, मला या सभागृहात रहायचंच नाही.', असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांच्या परिचय योग्य नसल्याचा आक्षेपही फडणवीस यांनी नोंदवला. 

आणखी वाचा - आणखी वाचा - 'आम्ही फोडा फोडी केली तर भाजप रिकामी होईल!'

आणखी वाचा - आणखी वाचा - भाजप भेटीपूर्वी अजित पवारांनी फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला; घड्याळ काढले

देवेंद्र फडणवीस यांचे आक्षेप
विधिमंडळाचे अधिवेशनच संविधाना धरून नाही
राष्ट्रगीत झाल्यानंतर अधिवेशन संपते, 
हंगामी अध्यक्ष नेमल्यानंतर त्यांना, दूर करता येत नाही
विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यापूर्वी विश्वासदर्शक ठराव होत नाही 
शपथविधी सोहळ्यात नियमबाह्य पद्धतीने शपथ घेण्यात आली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadnavis and bjp leaders walk out from maharashtra assembly