राहुल गांधींना इतिहासाचं ज्ञान नाही; सावरकरांविषयीच्या उल्लेखावरून फडणवीस संतापले

Rahul Gandhi and Devendra Fadnavis
Rahul Gandhi and Devendra Fadnavis
Updated on

मुंबई - विनायक सावरकर यांच्यावर स्वातंत्र्य लढ्यातील योगदनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र लढ्यातील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gandhi and Devendra Fadnavis
रिमोट कंट्रोलचा प्रश्नच नाही, दोन्ही उमेदवार दिग्गज; राहुल गांधी स्पष्टच बोलले

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सावरकर इंग्रजांचे हस्तक होते. ते इंग्रजांकडून पैसे घेत होते, अशा अनेक गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात. मी राहुल गांधींचा निषेध करतो. सावरकरांच्या पाठिशी मोठ्या प्रमाणात भारतातील जनता होती. त्यामुळे काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा अपमान केला. स्वातंत्र्यानंतर जाणीवपूर्वक सावरकरांना अपमानित करण्याचं काम काँग्रेसने केल्याचा आरोप फडणवीस यांनी केलं.

सावरकरांनी अनेक क्रांतीकाऱ्यांना प्रेरणा दिली. इंग्रजांचे अत्याचार सहन करूनही अंदमानातील कारागृहात ते भारतीय स्वातंत्र्यांचा विचार करत होते. त्यांनी अनेक कैद्यांना तिथं धीर दिला आहे. त्यामुळे आम्ही राहुल यांचा निषेध करतो. शिवाय राहुल यांनी कितीही सावरकरांवर आरोप केले तरी ते भारतीयांच्या मनातून सावरकरांची चांगली प्रतिमा कधीही पुसू शकणार नाही, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Rahul Gandhi and Devendra Fadnavis
Amit Shah : ..त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं; अमित शहांनी सांगितला 'किस्सा'

दरम्यान भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या यात्रेला स्वागतासाठी शिवसेनेचे नेते ते पाठवणार आहेत का, असा सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur rural police
jewellery theft
YCMOU nashik
Maharashtra Latest Marathi News Live Update
Marathi News Esakal
www.esakal.com