Devendra Fadnavis : फडणवीस संतापले; ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्याला म्हणाले, निर्बुद्धांना... | Devendra Fadnavis attack on Thackeray group leader sanjay raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : फडणवीस संतापले; ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्याला म्हणाले, निर्बुद्धांना...

मुंबई - एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शाब्दिक जुगलबंदी सातत्याने सुरू आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकारण तापलं असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis news in Marathi)

राजकारणात माणूस कधी वर जातो कधी खाली जातो. पण इतक निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातून त्यांच्या बुद्धीची लोकांना दया येते. त्यांच्या बोलण्याने काही परिणम होत नाही. या लोकांना वाटतं मग यांना मोठे नेते आपण म्हणतो. संजय राऊत जे बोलले ते निर्बुद्धपणे बोलतात. त्यांना मी काय उत्तर देऊ, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांच्याकडे लिमिटेड डिक्शनरी आहे. त्यात १०-२० शब्द आहेत. तेच शब्द ते फिरवून-फिरवून वापरतात, असंही फडणवीस म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात संजय राऊत यांनी खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत म्हणतात, "गेली ४० वर्षे मी सार्वजनिक जीवनात आहे. राजकारणासोबत पत्रकारिता करत आहे. मला अनेकदा ठार मारण्याच्या धमक्या येत असतात आणि तसे प्रयत्नही झाले. मी आज आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, माझ्यावर हल्ला करण्याचा कट ठाण्यात शिजल्याची माहिती अत्यंत विश्वसनीयरित्या समजली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली असून मला समजलेली ही माहिती अत्यंत जबाबदारीने आपल्या निदर्शनास आणत आहे."