Chief Minister Devendra Fadnavis addressing the media while criticizing Thackeray Brothers over Marathi identity politics during Mumbai civic election discussions.
esakal
महाराष्ट्र बातम्या
Devendra Fadnavis : मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण करण्यापलीकडे ठाकरे बंधुंनी काय केलं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
Mumbai Municipal Election : ही लढाई मराठी माणसाची नसून ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वाची आहे, असा आरोप त्यांनी केला.मराठी माणसाचे अस्तित्व कोणीही नष्ट करू शकत नाही, असे स्पष्ट मत फडणवीसांनी मांडले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरुच असून ठाकरे बंधूंकडून मराठी माणसांच्या अस्तित्वाबाबत केल्या जाणाऱ्या प्रचाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. साम टिव्हीला "ब्लॅक अॅंड व्हाईट" या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही लढाई मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधुंच्या अस्तित्वाची असल्याचे म्हटले आहे.

