esakal | 'काँग्रेस, राष्ट्रवादीबाबत सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Congress, NCP

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आरशात पहावे, अशी टीका माझ्यावर केली. आम्ही आरशात पाहत नाही तर जनतेच्या चेहऱयात पाहतो. तेथे जे दडले आहे ते दिसते. आरशात पाहण्याची वेळ तुमच्यावर आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

'काँग्रेस, राष्ट्रवादीबाबत सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही'

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची हवा संपली आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

महाजनादेश यात्रेनिमित येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात वंचित बहुजन आघाडी हे ए टीम आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही बी टीम झाली आहे. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्यावर फडणवीस हे ज्योतिषी आहेत का अशी टीका केली. खरे तर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची हवा संपली आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. राज्यातील जनताच त्यांच्या पाठीशी नाही. सर्व जनता ही भाजपच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आरशात पहावे, अशी टीका माझ्यावर केली. आम्ही आरशात पाहत नाही तर जनतेच्या चेहऱयात पाहतो. तेथे जे दडले आहे ते दिसते. आरशात पाहण्याची वेळ तुमच्यावर आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

loading image
go to top